चंद्रपूर - चंद्रपूर महानगर पालिके मधील मजदुर आणि मागास असलेला वर्ग बाबूपेठ प्रभागा मध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. तसेच येथील रेल्वे उड्डाण पुलाची मागणी मागील 3० वर्षापासून होती. ती मागील ५ वर्षा अगोदर मान्य केली पण काम मात्र कासव गतीने मागील चार वर्षापासून सुरू आहे. मागुन मंजुर झालेला दाताळा ऊड्डाण पुल 1 वर्षात पुर्ण झाला परंतु जिथे लाखो लोक ये जा करतात त्या ब्रीज चे बांधकाम ५०% सुध्दा पूर्ण झालेले नाही. या ब्रीज च्या बांधकामांने सामान्य बाबुपेठकर त्रस्त झालेले आहे. त्यात महानगर पालिकेने अमृत कलश योजनेच्या नावाने चांगले रस्ते फोडून अख्खं बाबूपेठ खड्यात टाकले आहे. #news34chandrapur
लोकांना आपला जीव मुठीत घेऊन हा जीव घेणा प्रवास करावा लागतोय. व लाखो रूपये दवाखान्यात भरावे लागतात याला जबाबदार कोन ?
येथील नगरसेवक आणि मनपाच्या दुर्लक्ष पणामुळे गंभीर अपघात होत आहे.मनपा प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुध्दा झोपेच सोंग करणाऱ्या या मुजोर भाजपशासीत मनपाला त्याचा काही फरक पडताना दिसत नाही.
या झोपेचं सोंग करणाऱ्या भाजप शासित महानगरपालिकेला त्यांच्या कर्तृत्वाची जबाबदारी ची जाणिव करुन देण्याकरिता महानगर सचिव राजु शंकरराव कुडे यांच्या नेत्रृत्वात तसेच जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांचे मार्गदर्शनात बाबुपेठ मध्ये जिथे गड्डा तिथे आंदोलन दिनांक ०९/०८/२०२१ रोज सोमवार ला बाबुपेठ मधील चौका चौकात करण्यात आले.
यां आंदोलनाला यशस्वी करण्याकरिता सय्यद अश्रफ अली, चंदू मारगुडवार, निखिल बरसागडे, जयंत थूल, कालिदास ओरके, सुखदेव दरुंडे यांनी अथक परिश्रम घेतले तर या आंदोलना मध्ये चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ मुसळे, संघटनमंत्री राजेश बेले, चंद्रपूर विधान सभा अध्यक्ष हिमायु अली, जिल्हा युवा अध्यक्ष मयूर राईकवांर, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी,शहर संघटन मंत्री सुनील भोयर, सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवर, शहर उपाध्यक्ष योगेश आपटे, सिकंदर सगोरे, बबन कृष्णपलीवार, अजय डुकरे, महेश गुप्ता, राजेंद्र जिल्लेवार, राहील बेग, बाबाराव खडसे, सुरेंद्र जीवने तसेच आम जनता मोठ्या संख्येने उपस्थिती होती.