चंद्रपूर - जिल्हा अध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये Fogging मशीन द्वारे मच्छर , कीटकनाशक फवारणी अभियान जटपुरा गेट पासून सुरुवात दिनांक 8/8 2021 रोज रविवार पासून सुरू करण्यात येत आहे. जे काम महानगपालिका ला करायला पाहिजे ते काम मनपा व्यवस्थित करताना दिसत नाही म्हणून जोपर्यंत चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये डेंग्यू मलेरिया मुक्त होत नाही तोपर्यंत हे अभियान सातत्याने सुरू राहील. मानवी जीवनाच्या आरोग्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी चंद्रपूर जिल्हा आम आदमी पार्टी यांच्याद्वारे करण्याचा प्रण घेतलेला आहे.
मागील कित्येक दिवसांपासून आपण बघत आहोत मनपा प्रशासनाकडून फाॅगींग चा निवळ दिखावा केला जातो अशी आम जनतेकडून ओरड तसेच तक्रार नेहमी होत असते. जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे याकरिता हे अभियान चंद्रपूर शहरापासून बल्लारशाह, घुग्गुस, राजुरा ,चिमुर ते संपूर्ण जिल्ह्यापर्यंत जनतेच्या आरोग्याची ची सेवा करण्याकरता आम आदमी पार्टी ही मलेरिया डेंग्यू पासून जनतेची रक्षा करण्याकरीता मच्छर कीटनाशक( fogg)फवारणीच्या अभियानाला सुरुवात करण्यात येत आहे.
या मोहिमेमध्ये जिल्हा सचिव संतोष दोरखंडे जिल्हा, कोषाध्यक्ष भिवराज सोनी, विधानसभा प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष हीमायु अली, जिल्हा युवा अध्यक्ष मयूर राईकवार , घुग्गुस शहर अध्यक्ष अमित बोरकर , बल्लारपूर शहराध्यक्ष रवी पप्पूलवार, युवा पदाधिकारी अमीत चिलके यांच्या अध्यक्षतेखाली हे अभियान चालणार आहे .या कार्यक्रमाला शहर सचिव राजू कूड़े, महानगर संघटन मंत्री सुनील भोयर, अजय डुकरे,अॅड.संजिव खोब्रागडे,सिकंदर सागोरे, राजेश चेटगुलवार, अशरफ सय्यद, चंदू माडूरवार, एड सुनीता पाटिल जिल्हा पदाधिकारी, नाहिदा काज़ी, मंजू निशाद,राहुल यादव,बंडू पहानपट्टे, शंकर धुमाले ऑटो संगठन अध्यक्ष, राजेश पोटे, सचिन खोबरागड़े, कालिदास ऊके, प्रतीक विराणी, मधुकर साखरकर,सोनू हिवरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. #news34