घुघुस - 12 ऑगस्टला घुघुस शहरातील तुकडोजी नगर येथील 24 वर्षीय अंकित नगराळे यांच्या घरून दुचाकी वाहन क्रमांक Mh34 Bq 8717 चोरी गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने घुघुस पोलिसांनी तपास सुरू केला असता 2 आरोपींना घुघुस पोलिसांनी अटक करीत कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी वाहन चोरी केली असल्याची कबुली दिली.
आरोपी 30 वर्षीय प्रवीण उर्फ परव्या उत्तम बोथले, 26 वर्षीय दयानंद संभाजी भोगे रा. जिवती यांना अटक करीत चोरी गेलेलं वाहन किंमत 35 हजार रुपये जप्त करण्यात आले.
सदरची कारवाई पोउपनी आमटे, पोलीस कर्मचारी मनोज धकाते, महेंद्र वन्नकवार, प्रकाश करमे, सचिन डोहे आदींनी यशस्वीपणे पार पाडली.
