घुग्घुस : देशाचे माजी पंतप्रधान संगणक क्रांतीचे जनक देशाला पंचायतराज देणारे स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त घुग्घुस युवक काँग्रेस तर्फे युवक काँग्रेस प्रदेश सचिव शिवानी ताई वड्डेटीवार यांच्या नेतृत्वाखाली युवक जिल्हा उपाध्यक्ष सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख यांच्या तर्फे अनाथ आश्रम येथील मुलांना दोन महिन्याचे संपूर्ण राशन व किराणा साहित्य देण्यात आले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बद्दल मुलांना विस्तृत माहिती देत आज देशाला राजीव गांधी यांच्या विचारांची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. News 34
याप्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष हरीश कोत्ततावार, प्रदेश सचिव सचिन कत्याल, विधानसभा अध्यक्ष राजेश अडडुर, जिल्हा महासचिव भावेश जंगम, अजय चिनूरवार, स्वप्निल कावड़े, कांग्रेस नेते शेखर तंगलापेल्ली, अजय उपाध्य, युवक उपाध्यक्ष घुग्घुस निखिल पुनघंटी, अमित सावरकर, सचिन कांबळे, निरंजन कोंडरा भारत बरगेला, विजय गुप्ता, प्रशांत शिल्का, ऋषभ दंभारे, विजय रोहिदास, अक्षय आधे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.