गडचिरोली - आज देश 75 वा स्वातंत्र्य दिनाच्या आनंदात आहे, देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाले आहे मात्र स्वातंत्र्य दिनीच गडचिरोली जिल्ह्यातील मरेगाव ग्रामपंचायत, पंचायत समिती येथे कार्यरत 35 वर्षीय ग्रामसेविका प्रीती त्रिशूलवार यांना लाचेचा मोह आवरता आला नाही. News 34
मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या ग्रामसेविकेला लाच घेताना रंगेहात अटक केली.
फिर्यादी तक्रारदार महिला यांच्या मानधनाचे धनादेश काढून देण्यासाठी ग्रामसेविकेने 3 हजार रुपये लाचेची मागणी केली. Anti corruption trap
तक्रारदाराला पैसे द्यायचे नसल्याने त्यांनी याबाबत गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार देत संपूर्ण हकीकत सांगितली.
12 ऑगस्टला लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यावर 15 ऑगस्टला सापळा रचला, तडजोडीअंती 2 हजार रुपये देण्याचे ठरले.
सदरची कारवाई गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, पो.हवा नथ्थु धोटे, पो.ना. सतीश कत्तीवार, देवेंद्र लोनबले, पो.शि. किशोर ठाकुर, महेश कुकुडकार, मपोशि सोनल आत्राम, सोनी तावाडे, चा.पो.ना. तुळशिराम नवघरे सर्व ला.प्र.वि. यांनी यशस्वीपणे पार पाडली.

