चंद्रपूर - चंद्रपूर-नागपूर रोडवरील पाण्याच्या टाकी जवळ चांदा मोटर्स या नावाने आरिफ खान पठाण यांचं कार्यालय आहे, दुचाकी व चारचाकी वाहन विक्रीचा ते व्यवसाय करतात.
16 जुलैला इंडिका कार क्रमांक MH-04-FZ-5290 या वाहनांची चावी हरविली होती. चावीचा शोध घेतला मात्र ती कुठंही आढळून आली नाही.
सदर गाडी ही चांदा मोटर्स च्या पार्किंग मध्येच पार्क करण्यात आली होती.
17 जुलैला रात्री 10 वाजेदरम्यान अज्ञात चोराने ते वाहन पार्किंग मधून लंपास केले, सदर वाहन हे ठाणे जिल्ह्यातील किशोर पाटील यांच्या नावाने आहे, वाहन चोरी ही त्या वाहनांच्या चावीचा उपयोग करून झाली असा अंदाज पठाण यांनी लावला आहे. कारण कारचा लॉक हा अज्ञात चोराने सेन्सरने अनलॉक केला होता.
कार चोरीचा संपूर्ण घटनाक्रम हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यासंबंधी रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे, पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
सदर कार्यालयात चौकीदार व दोन मुले कार्यरत आहे.