चंद्रपूर/Tadoba - ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील तामसी बिट, घोसरी गावाजवळ दीड वर्षीय वाघाचा मृतदेह आढळून आला.
19 जुलैला सदर वाघाचा मृतदेह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाला असून मृतदेह TTC सेंटर ला नेण्यात आला आहे. 20 जुलै ला सकाळी शवविच्छेदन अहवाल मिळाल्यावर वाघाचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला याची माहिती समोर येईल. अशी माहिती वन विभागातर्फे देण्यात आली आहे.