News34
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल तालुक्यातील नांदगाव येथील नवनिर्वाचित सरपंच कु.एड.हिमानी दशरथ वाकुडकर ही युवती कायद्याची पदवी संपादन करुन केवळ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःच्या जीवन करीअर कडे लक्ष न देता राजकीय क्षेत्रात पहिले पाऊल टाकून ग्रामस्थांचे मन जिंकून पहिल्यांदा यशस्वी झाली. मनात जिद्द,चिकाटी,परिश्रम,माणस जोडाची किमया अंगी असलेली एड. हिमानी नंदगावच्या प्रथम नागरिक सरपंच म्हणून पदभार हाती घेतला आणि विकासाची सुरवातच तिने स्वच्छता अभियानापासून केली व स्वतःच्या श्रमदानामधून गावातील संपूर्ण नाल्या स्वच्छ करण्याचा संकल्प केला असता ग्राम पंचायतचे सदश आणि ग्रामस्थ देखील हिमानीच्या परिश्रमाला प्रतिसाद दिला. गावातील प्रत्येक नागरिकांच्या हाकेला धाऊन जाऊन विकास कामे कसे करायचे याची उत्तम जाण तिला झाली असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले. ग्राम पंचायत विकास कामाबाबत योग्य नियोजन करायचे असेल तर कमिटी मेंबरला विश्वासात घेऊन त्यांना प्रत्येक बाब समजाऊन सांगूनच पुढे पाऊल टाकत असते. म्हणूनच अल्पावधीत एड.हिमानी यांची महाराष्ट्र ग्रामसंवाद सरपंच संघ चंद्रपूर जिल्ह्याच्या महिला विभागाच्या अध्यक्षा म्हणून निवड होणे ही हिमानी च्या पुढच्या राजकीय शिळीची पहिली पायरी आहे. महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष,माजी विधानसभा अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले हे प्रथम विदर्भाच्या दौऱ्यावर आले असता मुल येथे तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सरपंच एड.हिमानी यांनी मान. नाना पटोले यांचे स्वागत करतांना आपला परिचय दिला त्यावेळेस नाना पटोले यांनी हिमणीचे अभिनंदन करुन ऐका लहानशा गावची सरपंचच महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री होऊ शकते. कारण स्व.विलासराव देशमुख हे सरपंच पदावरूनच मुख्यमंत्री झाले असल्याचे जाहीर भाषणातून सांगून एड.हिमानीचे कौतुक केले. याप्रसंगी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष,कांग्रेस नेते संतोषसिंह रावत,विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी हिमानीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. म्हणून तिच्या कर्तृत्वाने तिची ग्राम संवाद सरपंच संघाच्या चंद्रपूर जिल्हा महिला विभागाच्या अध्यक्ष पदी निवड होणे ही राजकीय क्षेत्रातील पहिले पाऊल असल्याचे सरपंच हिमानीने बोलून दाखविले. असले तरी एड.हिमानीला राजकारणाचे बाळकडू मात्र मुल पंचायत समितीचे माजी उपसभापती वडील दशरथ वाकुडकर यांनी पाजले हे खरे आहे. एड.हिमानीच्या निवडी बद्दल संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंचांनी तिचे अभिनंदन केले आहे.