चंद्रपूर - नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण/तरुणींसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मधून आनंदाची बातमी आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 6 हजार 348 जागांसाठी मेगा भरती केल्या जाणार आहे.
सदर भरती ही अप्रेंटिस पदासाठी आहे.
6 हजार 348 जागांपैकी महाराष्ट्रात 390 रिक्त जागा भरणार आहे.
या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक अहर्ता ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक असून उमेदवाराचे वय 20 ते 28, SC, ST व OBC उमेदवारांना 5 वर्षाची सूट असणार.
सदर पदासाठी लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड होणार असून परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेतल्या जाणार आहे.
परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 26 जुलै 2021, ऑनलाइन अर्ज हा ibpsonline.in या संकेतस्थळावर करावा.