कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी वित्त,नियोजन,वन तथा पालकमंत्री,विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरपना येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते झाले तर अध्यक्ष म्हणून भाजप तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांची उपस्थिती होती.गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष तथा राजूरा विधानसभा बुथ विस्तारक सतीष उपलेंचीवार,गडचांदूर न.प.नगरसेवक अरविंद डोहे, कोरपना न.प.नगरसेवक अमोल आसेकर,विशाल गज्जलवार, अरूण मडावी, पुरूषोत्तम भोंगळे, आशिष ताजने,जेष्ठ नेते रमेश पाटील मालेकर, इंदिराताई कोल्हे,ओम पवार, अनील कौरासे, नरेंद्रुलवार,शशिकांत अडकिने, प्रमोद कोडपे,दिनेश खडसे, सूनील देरकर,बाळू पानघाटे,जयाताई धारणकार आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.यावेळी ४८ च्या जवळपास रक्तदात्यांनी रक्तदान केले.यांना प्रमाणपत्र,भेटवस्तू तसेच कोरोना योद्धा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते तथा नागरीकांची यावेळी मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.संचालन अमोल आसेकर तर आभार आशिष ताजने यांनी व्यक्त केले.
आमदार व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल- बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार,व लोकलेखा समिती प्रमुख, माजी अर्थमंत्री माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्य मुल नगरात व ग्रामीण भागात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षा ग्रामीण संध्या गुरनुले होत्या. त्यावेळी त्यांनी बोलतांना एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी रक्त चढवण्याची आवश्यकता असते. अपघात, रक्तस्त्राव, प्रसवकाळ आणि ऑपरेशन ह्यां स्थितींमध्ये रुग्णास अत्यधिक रक्तस्त्राव होण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी रुग्णांना रक्ताची गरज पडत असते. थैलेसिमिया, ल्युकिमिया, हीमोफिलिया यासारख्या विकारांनी पीडित रुग्णांमध्ये वारंवार रक्ताची आवश्यकता पडत असते. अन्यथा त्यांच्या जीवितास धोका पोहचत असतो. यासाठी अशा रुग्णांना रक्त चढवणे अत्यंत गरजेचे असते.
जिल्ह्याचे लोकनेते आमदार व माजी अर्थमंत्री माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे शहरातील व ग्रामीण भागातील पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली. जवळपास ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी नगर परिषद अध्यक्षा रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदुभाऊ रणदिवे, सभापती चंदू मारगोनवर,भाजपा शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, महासचिव चंदू आष्ट्नकर, प.स.सदश पूजा डोहणे, वर्षा लोनबले, नगर सेवक प्रशांत समर्थ, विनोद सिडाम, महेंद्र करकाडे अनिल साखरकर, प्रशांत लाडवे, अजय गोगुलवार, नगरसेविका विद्या बोबाटे, आशा गुप्ता, प्रभा चौथाले, वनमाला कोडापे, गाडलेवार, वंदना पावडे, प्रशांत बोबाटे, इत्यादी उपस्थित होते.
तसेच ग्रामीण सरपंच बंडू नर्मलवार, उश्राला, मुकेश गेडाम माजी सरपंच डोंगरगाव, संजय येनूरकर, दिलीप पाल, प्रवीण मोहूर्ले, कल्पना पोलोजवर, रीना बद्दलवार, संजीवनी वाघरे, सारिका वासेकर, राकेश ठाकरे, अर्चना चावरे, पपिता झरकर, कुसुम भोयर,कल्पना मेश्राम, गजानन वलकेवार यांचेसह असंख्य जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ५९ युवकांनी केला भाजयुमो मध्ये प्रवेश
पक्षाच्या माध्यमातून युवकांच्या व जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्या - आशिष देवतळे
प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - महाराष्ट्राचे लोकनेते विकास पुरुष माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ५९ व्या वाढदिवसाच्या दिनाचे औचित्य साधून व त्यांच्या विकास कार्याला प्रभावित होऊन कामगार आघाडी प्रदेश महामंत्री अजय दुबे यांच्या मार्गदर्शनात, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा नेता मनीष रामील्ला यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरातील ५९ युवकांनी भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये पक्ष प्रवेश केला.
या कार्यक्रमात युवकांना संबोधित करताना भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे म्हणाले भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष नसून परिवार आहे आणि गोर-गरीब,शोषित व पीडित जनतेला न्याय मिळवून देणे तसेच जनतेच्या व युवकांच्या न्याय हक्कासाठी लढने हेच या पक्षाचे उद्देश आहे याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी जनतेचा आवाज बुलंद करा असे आव्हान केले. याप्रसंगी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मिथिलेश पांडे, नगरसेवक येलय्या दासरफ, जिल्हा सचिव शिवाजी चांदेकर, गुलशन शर्मा, मल्लेश कोडारी, प्रतीक बारसागडे, श्रीकांत उपाध्याय, आदित्य शिंगाडे, मौला निषाद, रिंकू गुप्ता, त्याच बरोबर असंख्य युवकांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी बल्लारपूर कार्यालयामध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे संचालन आदित्य शिंगाडे यांनी केले.
सुधीर मुनगंटीवार माजी अर्थमंत्री तथा अध्यक्ष-लोकलेखा समिती विधिमंडळ महाराष्ट्र यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा येथे रक्त दान शिबीर
वरोरा - सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या सूचनेनुसार वरोरा येथील नगर भवन येथे रक्त दान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी सरकारी रुग्णालयाचे कर्मचारी चमू चंद्रपुर वरुन आली यावेळी ३५ रूग्णांनी रक्त दान केले आमदार मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा पुर्ण सप्ताह सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जाणारा आहे
यावेळी जिल्हा महासचिव- श्री.नामदेव डाहुले, नगराध्यक्ष- श्री.अहेतेशाम अली, जिल्हा परिषद सभापती-राजु गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष- भगवानजी गायकवाड,माजी सभापती रोहिणी देवतळे, बाबासाहेब भागडे,पाणी पुरवठा सभापती अनिल साखरिया, स्वच्छता व आरोग्य सभापति-दिपाली टिपले, विनोद लोहकरे, जिल्हा महासचिव सचिन नरड, करन देवतळे, नगरसेवक दिलीप घोरपडे, डॉ दुर्गे, सुनिता काकडे,जगदीश तोटावार,भरत तेला,किशोर टिपले,बाबासाहेब काळमेघ, प्रकाश दुरर्गपुरोहीत,ओम यादव,अमित आसेकर, राजेश साकोरे,प्रमोद ढवस,ईश्वर नरड, गजानन राऊत, शरद कातोरे, आसाराम रोकडे, मधुकर ठाकरे, विलास गयनेवार, राजु दोडके, प्रकाश काकडे,शुभांगी निम्बाडकर,सुषमा कराड, चंद्रकला मत्ते, अनुराधा दुर्गे, आशिष रणदिवे,दादू खंगार, प्रतीक काळे, अनिल मत्ते अभिजीत गयनेवार, राहुल ँबांदुरकर,आकाश भागडे,रोशन लखोटे,अमोल देऊळकर, सूशील बाकडे,आदींची उपस्थितीती होती!
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर अध्यक्ष सुरेश महाजन,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमित चवले, युवामोर्चा चे कादर शेख, भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने यांनी प्रयत्न केले.




