चंद्रपूर - शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.श्री.नाम.उध्दव साहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित युवासेना कार्यकारीणी कदम, विस्तारक त्रिपाठीजी, शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे यांच्या नेत्रुत्वात व युवासेना पदाधिकारी यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेल्या आव्हानाला साद देत चंद्रपुर युवासेना च्या वतीने प्यार फाउंडेशन ह्या प्राणिमात्रांसाठी रात्रंदिवस काम करणार्या युवकांच्या या कार्यास युवासेना कडून वर्षेभर पुरेल इतके औषधे व ३००१/- राशी आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी साहेबांच्या वाढदिवसाचा केक कापुन त्यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी प्यार फाउंडेशन चे संस्थापक श्री देवेंद्र रापेल्ली यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यसंबंधी बोलतांना संवेदनशील, कुशल नेत्रुत्वाच्या हातात महाराष्ट्र असून ज्याप्रमाणे ते महाराष्ट्र कुटुंबाप्रमाने सांभाळत आहे महाराष्ट्राचा विकास नक्कीच होणार अशी प्रशंसा करीत सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. युवासेनाच्या वतीने जिल्हाभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये वृद्ध, अनाथ आश्रम धान्य वाटप, अनाथ मुलांना भोजनदान व माध्यमिक शाळेतील शैक्षणिक साहित्य वाटप,आरोग्य चाचनी शिबिर,रक्तदान शिबिर,वृक्षरोपन ई. सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.
येथे सुरू असलेल्या कार्याप्रती समाधान व्यक्त केले. सदर विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा चिटनीस विनय धोबे, युवासेना शहर प्रमुख अक्षय अंबिरवार, शहर समन्वयक करन वैरागडे,शहर चिटनीस नगाजी गनफाडे, तालुका प्रमुख हेमराज बावने, समन्वयक विपिन कोंगरे,गनेश रासपायले यांनी नेत्रुत्व केले . यावेळी उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर लोनगाडगे ,नितु बावरे,मुकेश जक्कुलवार,नंदु अराडै, उपशहर प्रमुख वैभव काळे समिर, शहर, तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.