चंद्रपूर - दिनांक 22/7/21 महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री मा ना अजितदादा पवार ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा सुप्रिया ताई सुळे ह्यांच्या वतीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट च्या माध्यमातून राष्ट्रवादी जिवलग नाते आपुलकीचे आधार म्हणून कोरोना काळात पालकत्व गमावलेल्या मुलांना आधार देण्याचे ठरविले.
आणि ह्याच उद्देशाने चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील कुमारी हिमावरी विकास लोहकरे ह्या मुलीची चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी भेट घेतली. त्या मुलीची सर्व समस्या ऐकून सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट च्या वतीने जे मदत होईल ती मदत त्या मुली पर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले.
ह्या वेळी जेष्ठ नेते बाबासाहेब वासाडे,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, शहर महिला कार्याध्यक्ष सौ चारुशीला बारसागडे, युवती कार्याध्यक्ष अश्विनी तालापल्लीवार, खुशी इत्यादी उपस्तीत होते.
पालकत्व गमावलेल्या हिमावरी लोहकरे ह्या बलिकेला सध्याची मदत करण्यात आली
आणि चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वोत्तपरी मदत करेल ह्याचे आश्वासन देण्यात आले.

