घुघुस - चंद्रपूर जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने थैमान घातले आहे, अनेकांची घरे पाण्याखाली आले आहे, सध्या प्रशासनातर्फे बचावकार्य सुरू आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास धानोरा गावाजवळील वाहणाऱ्या वर्धा नदीत 2 मृतदेह तरंगताना आढळून आले.
आढळलेले मृतदेह हे कुजलेल्या अवस्थेत असून त्यांची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे, यामध्ये 1 पुरुष व एका स्त्रीचा मृतदेह असल्याची आशंका आहे.
घुघुस पोलीस याबाबत तपास करीत असून सदर मृतदेह हे ग्रामीण भागातून वाहून आले की काय याबाबत सखोल चौकशी करीत आहे.
