चंद्रपूर - युवाहृदयसम्राट, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन तसेच राजशिष्टाचार मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री सन्माननीय श्री. आदित्यजीसाहेब ठाकरे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कार्यकारी सदस्य रूपेश दादा कदम, जिल्हा युवासेना विस्तारक त्रिपाठीजी, शिवसेना जिल्हा प्रमुख संदिपभाऊ गिर्हे, महानगर प्रमुख प्रमोदभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख इंजि.निलेश बेलखेडे यांच्या नेतृत्वात दिनांक १३ जुन रोजी ३१ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना प्रणित युवासेना जिल्हा चंद्रपूर तर्फे संपुर्ण जिल्हात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या मंत्राला अनुसरून ज्ञानार्चना विकलांग महीलाश्रम येथे तेथील विकलांग भगिनींच्या हस्ते मा.आदित्यसाहेबांच्या वाढदिवसाचा केक कट करण्यात आला तसेच महीलाश्राला आर्थिक मदत म्हणून धनराशी देण्यात आले.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिर्हे यांनी शिवसेना- युवासेना च्या वतीने पुढे हि लागेल ती मदत करण्याची ग्वाही देत आम्ही आपल्या सोबत सदैव आहे असा विश्वास तेथील महिला युवतींना दिला.संस्थेच्या अध्यक्षां अर्चनाताई यांनी तेथील महिलांनी कौशल्याने केलेल्या विविध कामांची माहिती देत युवासेना च्या उपक्रमाबद्दल आभार मानले व सदैव भावाप्रमाणे पाठीशी उभे असल्यामुळे हिम्मत आणि सर्वांना याने नवउर्जा मिळत असे सांगितले.
सोबतच यावेळी विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील राबविण्यात आला.यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा समन्वयक विक्रांत सहारे, वसिम भाई,सोनुभाऊ ठाकूर, युवासेना उपशहर प्रमुख करन वैरागडे , सुमित अग्रवाल,अश्विन देवतळे,अजित पांडे , प्रमोद नन्नावरे, वैभव काळे, प्रशांत यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रम यशस्वी करिता करण वैरागडे, जयेश नांढा, अश्विन देवतळे यांनी परिश्रम घेतले.

