राजुरा - शहरातील रेल्वे पुला लगतच्या शेतात काम करीत असलेल्या भाग्यश्री धनराज वाढई या 35 वर्षीय महिलेवर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
शहरातील अंबादास नगर येथील धनराज वाढई हे पत्नीसह रेल्वे पुला लगतच्या शेतात काम करीत होते. त्याचवेळी दोन वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरू झाला व पत्नी भाग्यश्री धनराज वाढई ही झोपडीकडे जात असतानाच तिच्या अंगावर वीज पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना आज शनिवारी दुपारी 2 वाजता घडली.
मृतक महिलेला 6 ते 7 वर्षाचे दोन मुले आहे. तिच्या मृत्यूमुळे कुटूंबावर शोककळा पसरली आहे.
