प्रतिनिधी/रमेश निषाद
राजुरा - जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना मदत करण्यात अग्रेसर असणाऱ्या फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपच्या संचालिका सरिता मालू यांनी कोरोना काळात नागरिकांची मदत केली होती.
रविवारी राजुरा तालुक्यातील टेम्भुरवाही येथे राहणारे अपंग नागरिक संतोष कुलसंगे यांना सरिता मालू यांनी व्हीलचेअर देत मदत केली.
यावेळी संतोष कुलसंगे यांनी फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.
यावेळी खुशी मालू, व्यंकटेश गड्डम, समरप्रित सिंग, मोहम्मद अनिश सैय्यद, पारेश मेश्राम आदी उपस्थित होते.
