चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपला जीव गमावला, दुसऱ्या लाटेमुळे राज्यात संचारबंदी घोषित करण्यात आली होती.
आजघडीला ही लाट ओसरत असताना सरकारने 7 जूनपासून निर्बंधात शिथिलता दिली आहे.
सोमवार 7 जून पासून सकाळी 7 ते 5 पर्यंत सर्व प्रतिष्ठाने उघडण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाने दिली.
तब्बल 2 महिन्यांनी शहरातील बाजारपेठ सुरू झाली आहे, मात्र नागरिकांची गर्दी बाजारात वाढत असल्याने पुढची परिस्थिती कशी असेल याचा अंदाज सध्यातरी वर्तविला जाऊ शकत नाही.
मात्र शहरातील व्यापारी बांधवांचे लसीकरण झाल्यास कोरोनाचा संभाव्य धोका कमी होऊ शकतो.
चंद्रपूर शहरातील व्यापाऱ्यांचे लसीकरण व्हावे यासाठी चंद्रपूर व्यापारी मंडळाचे शिष्टमंडळ आमदार सुधीर मुनगंटीवार यांना भेटले.
व्यापाऱ्यांच्या अडचणी, ग्राहकांचा थेट संपर्क व कोरोना सारख्या विषाणूवर कोविड लसीकरणाने संभाव्य धोका कमी होऊ शकतो यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
आमदार मुनगंटीवार यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन देत जिल्हाधिकारी गुल्हाने यांना व्यापारी कोविड प्रतिबंधक लसीकरण संदर्भात पत्र लिहले.
लवकरचं व्यापारी बांधवांचे लसीकरण सुरू करणार असल्याची सकारात्मक चर्चा जिल्हाधिकारी व आमदार मुनगंटीवार यांच्यात दूरध्वनी द्वारे करण्यात आली.
यावेळी व्यापारी मंडळाचे राम किशोर सारडा, रामजीवन परमार, प्रभाकर मंत्री, दिनेश बजाज, अरविंद सोनी, अनिल तेलियानी, सत्यम सोनी, पंकज शर्मा, चिराग नथवाणी, संदीप माहेश्वरी, राकेश तहलियानी, मुन्ना चांडक, नरेश मोटवाणी व मनीष राजा उपस्थित होते.
