चंद्रपूर: रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन, चंद्रपूर तर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चंद्रपुरातील रेल्वे स्टेशन परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी रक्षण धरणीमातेचे फाउंडेशन चे अध्यक्ष राहुल कोटकर, व्यवस्थापक श्रेयस शेंडे, भूषण सोनकुसरे, राजू पिसे, वैष्णवी डंभारे इत्यादी सदस्यांसोबतच चंद्रपूर रेल्वे स्टेशनचे सहाय्यक वाणिज्य प्रबंधक श्री वि.सि. थूल व स्टेशन इन्चार्ज मूर्तीजी उपस्थित होते. संस्थेच्या सदस्यां अनिता पिसे, माधुरी शेंडे, रश्मी कोटकर तर्फे सीड बॉल्स बनवून त्याचे रोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे पर्यावरणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सरतेशेवटी सर्व उपस्थित सदस्यांमार्फत तसेच सहाय्यक वाणिज्य प्रबंधक मार्फत शपथ विधी कार्यक्रम पार पाडण्यात आला.
