चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे मे महिन्यात लागलेल्या आगी बद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऊर्जा मंत्री नितीन राऊत व मुख्य अभियंता यांच्याकडे विद्युत केंद्रातील संच क्रमांक आठ व नऊ च्या कोळसा हाताळणी विभागात लागलेल्या आगी बद्दल नेमके कारण काय याची माहिती दिली व त्वरित चौकशी समिती नेमून झालेल्या घटनेची माहिती जनतेसमोर आणावी यासाठी निवेदन देण्यात आले होते परंतु एक महिना लोटूनही यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याने आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्यातर्फे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना निवेदन देऊन संबंधित घटनेत दोषी असलेले कंत्राटदार व अधिकारी यांची सखोल चौकशी व्हावी यासाठी मागणी केली, व ज्या कोळसा हाताळणी विभागात ही घटना घडली त्या कन्व्हेअर बेल्ट च्या देखरेखीसाठी कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आलेले आहे परंतु रात्रीच्या वेळी तेथे कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याने व तेथे बसविण्यात आलेले आग नियंत्रक यंत्रणा कुचकामी ठरल्याने सदर घटना घडली, म्हणून भविष्यात असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी हयगय करणाऱ्य दोषी अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराला कोणतीही सूट न देता उच्चस्तरीय समिती गठीत करून याची सखोल निष्पक्ष चौकशी व्हावी व गुन्हेगारांना याची सजा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी गग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, तालुकाउपाध्यक्ष मयूर मदनकर,तालुकासचिव करण नायर हे उपस्थित होते.