माजरी - :- भद्रावती तालुक्यातील "सर्वात मोठी ग्राम पंचायत माजरी" (१३ हजार लोकसंख्या) गावातील वेकोली परिसरातील शेकडो घरं अंधारात असल्यामुळे त्यांच्या विजेचा व नवीन वीज कनेक्शनचा प्रश्न जिल्हाध्यक्ष श्री राजेन्द्र वैद्य यांच्यापर्यंत भद्रावती तालुका अध्यक्ष श्री सुधाकर रोहनकर,श्री.मुनाज शेख यांनी आणला,राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री व जिल्ह्याचे संपर्कमंत्री मा.ना.प्राजक्त तनपुरे हे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्या निदर्शनास माजरीवासियांचा हा महत्त्वाचा विषय जिल्ह्यातील या नेत्यांनी आणून दिला, व त्याला प्रतिसाद देत ना.प्राजक्त तनपुरे यांनी आज यवतमाळकडे जातांना प्रत्यक्ष माजरी गावात जावून नागरिकांसोबत बैठक करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या,सोबत महावितरणचे सर्व वरिष्ठ अधिकारी, तसेच WCL माजरीचे CGM श्रीयुत गुप्ता यांना या बैठकीत बोलावून घेतले,व सविस्तर चर्चा करून माजरी वासियांना तात्काळ नवीन विजेचे कनेक्शन एक महिन्यात देण्याचे आदेश दिले,त्याकरिता त्यांनी तात्काळ ९६ लाखांचा निधी माजरी गावात नवे ट्रान्सफॉर्मर व विजेच्या लाईन व या सर्व कामांकरिता मंजूर केले,व हे सर्व काम पूर्ण होईस्तोवर सध्या WCL तर्फे सुरू असलेला वीज पुरवठा तसाच सुरू ठेवण्याचे निर्देश WCLचे CGM श्री गुप्ता यांना दिले,व त्यांनी ते मान्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका मंत्र्यांच्या कामाची पद्धत पाहून उपस्थित सर्व माजरी वासीय थक्क झाले, आणि त्यांनी मा.ना.प्राजक्त तनपुरे यांचे धन्यवाद व आभार मानले.
या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य,भद्रावतीचे ज्येष्ठ नेते श्री.मुनाज शेख,तालुका अध्यक्ष श्री.सुधाकर रोहनकर, माजरी येथील माजी सरपंच बंडु वनकर,महीला जिल्हाध्यक्षा सौ. बेबिताई उईके,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.सुनील दहेगावकर,चंद्रपूर म.न.पा.चे माजी नगरसेवक श्री.संजय वैद्य,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल दहेगावकर, कामगार सेल चे फैयाज शेख, सामाजिक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे, वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष श्री.पंकज जगताप, अशरफ खान,असलम बेग कामगार नेता व ग्रामपंचायत सदस्य सतीश कुडुदुला मेहबुब हसन,आणि राष्ट्रवादी पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.त्यानंतर मा. मंत्रीमहोदयांनी माजरीत सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला सुद्धा भेट दिली.