गुरू गुरनुले/प्रतिनिधी
मुल - मुल तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भेजगाव येथे ३३/११ के.व्ही. उपकेंद्र त्वरित मंजूर करावे अशी मागणी भेजगाव वासीय ग्रामस्थांच्या वतीने भेजगाव ग्राम पंचायतिचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अखिल गांगरेड्डीवार यांनी महाराष्ट्राचे ओबीसी व मदत पुंसर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार यांचेकडे गावकऱ्यांच्या सहीचे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. भेजगाव परिसरातील चक घोसरी व ताडाला परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीवर मोटार पंप लावले आहेत परंतु नेहमीच विद्युत पुरवठा बंद होत असल्याने कृषी पपं निकामे ठरत असून शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. करिता ३३/११ के.व्ही.ची नितांत गरज असल्याचे निवेदनामध्ये गावकऱ्यांनी म्हटले आहे. तसेच भेजगाव परिसरात खेडे गाव ५०ते ६० गावे येत असून ग्रामीण लोकसंख्या भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे बेंबाळं प्राथमिक आरोग्य केंद्र २० ते २५ कि. मी. अंतरावर येत असल्याने जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने गरसोईचे होत आहे.प्रसंगी रुग्णांवर त्वरित उपचार होत नसल्याने अनेक रुग्णही दगावले आहेत. करिता ग्रामीण जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने भेजगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने भेजगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित मंजूर करावे अशी मागणी भेजगाव परिसरातील गावच्या नागरिकांच्या वतीने व त्यांच्या स्वाक्षरी केलेल्या एका लेखी निवेदनाद्वारे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषशिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली नाम.पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे मागणी केली असून निवेदन देतांना तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, संचालक यांचेसह भेजगाव परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
