चंद्रपूर - अभियांत्रिकि आणि पदविका अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांचे कोरोना काळातील परिक्षा शुल्क कमी करण्याबाबत शिवसेना जिल्हा प्रमुख संदिपभाऊ गिर्हे, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना उपशहर प्रमुख करन वैरागडे यांच्या वतीने उच्च ,तंत्रशिक्षणमंत्री मा.उदय सामंत साहेब यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात कोविड–१९ रोगाच्या संसर्गामुळे पसरलेल्या रोगराई वर मात मिळविण्यासाठी आपल्या यंत्रणेकडुन करण्यात आलेल्या नियोजनबद्ध यशस्वी प्रयत्नांकरिता महाराष्ट्र सरकार चे हार्दिक अभिनंदन!.
मार्च २०२० पासून कोरोना या रोगामुळे पसरलेल्या महामारित अनेक लोक बळी पडले आहेत. तसेच कोरोना रोगाचा संसर्ग थांबविण्याकरिता भारत सरकार तर्फे घेण्यात आलेल्या संपूर्ण ताळेबंदिच्या निर्णयामुळे अनेकांच्या नौकऱ्या ही गेल्यात तर अनेकांचे रोजगार ही बुडाले आहेत. या भिषण महामारिच्या काळातही आरोग्य यंत्रणा हे आपले कर्तव्य हे जबाबदारीने पार पाडत आहेत आणि सोबतच शिक्षण विभागात कार्यरत सर्व शिक्षक वर्गानेही ऑनलाईनच्या मदतीने सर्व विद्यार्थांना ज्ञानार्जनाचे यशस्वी कार्य केलेत. परंतु कोरोना महामारीला बळी पडलेल्या पालक वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक विद्यार्थांना तर २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासुन वंचित राहावे लागले. आजही अनेक विद्यार्थि शैक्षणिक शुल्क सुद्धा महाविद्यालयात भरण्यास असमर्थ ठरत आहेत. तसेच अनेक विद्यार्थि आर्थिक अडचणिमुळे विद्यापिठाकडुन आकारलेले परिक्षा शुल्क भरु शकत नाही आहे. त्यातच शैक्षणिक सत्र २०२०-२१ चीशिष्यवृत्तीचा पहिला टप्पा आजतागयत विद्यार्थांना मिळालेला नाही. शिष्यवृत्तीच्या सहायता मिळत नसल्याने संपूर्ण विद्यार्थि वर्ग हा हतबल होउन बसला आहे. सध्याच्या स्थितीत कोणत्याही विद्यार्थाला महाविद्यालयात येउन परिक्षा घेण्यात विद्यापिठाने मनाई केलेली असल्याने विद्यापिठाला कोणताही पेपर पुरवणिचा खर्च येत नाही कारण सर्वच अभ्यासक्रमांची परिक्षा ही ऑनलाईन घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच त्या पुरवणिंच्या आणन्या नेण्यासाठी कोणताही वाहतुक खर्चही येत नाही. सोबतच परिक्षा घेण्याकरिता महाविद्यालयालाही कुठलाही खर्च येत नाही. अश्यावेळी विद्यार्थाकडुन पूर्ण परिक्षा शुल्क आकारणे हे योग्य नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतकेच अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आजुबाजुला अनेक गावे आहेत ते दुर्गम भागात मोडतात. सदर गावातील अनेक हुशार व होतकरु विद्यार्थि हे तंत्रशिक्षण घेण्याकरिता चंद्रपूर कडे येतात. परंतु कोरोना च्या महामारिच्या काळात अनेक पालकांचे छोटे मोठे रोजगार बुडाल्याने ते आर्थिक संकटात सापडलेले आहेत. कोरोना च्या या काळात विद्यार्थि हा मानसिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या हतबल असला तरि त्याची शिक्षणाची आवड कमी झालेली नाही. आपल्या कडुन विद्यार्थांना कोरोना काळापूरते तरि परिक्षा शुल्कात ५०टक्याने कपात करण्याचे आदेश विद्यापिठांना देण्यात यावे आणि मागिल वर्षाचे ५० टक्के परिक्षा शुल्क विद्यार्थांना परत करण्यात यावे. ही मागणी युवासेना च्या वतीने करण्यात आली या वेळी मंत्री साहेबांनी लवकरात लवकर बैठक घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा मिडेल असा विद्यार्थीइतया निर्माण घेऊ असे आश्वासन दिले सदर निवेदन देताना उपशहर प्रमुख युवा सेना वैभव काळे, कुणाल आगडे, मोहित बुटले,निमेश साठोने,प्रतिक गायकवाड, कपिल हिवाळे,शुभम वासाडे उपस्थित होते.
