News34
चंद्रपुर- मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्व असून कोरोना काळात योगाभ्यास न करणाऱ्यावर फारसा प्रभाव पडला नसून नियमित व सातत्याने योगाभ्यास केल्यास जीवन निरोगी होईल असे प्रतिपादन योग गुरू व मार्गदर्शक श्रेया येणारकर चंद्रपूर यांनी केले त्या श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील सभागृहात झालेल्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर संस्थेचे प्राचार्य राजेश पेशट्टीवार , निसर्गोपचारक सीमा वनकर ,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पान्हेरकर यांची उपस्थित होते. योगगुरू श्रेया यांनी आपल्या शास्त्रीय व वैज्ञानिक मार्गदर्शन व प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना खिळविले.या कार्यक्रमाप्रसंगी दिव्यांग क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते देवराव कोंडेकर यांचा रक्तदान चळवळीतील योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रशिक्षण केंद्राचे सर्व कर्मचारी वर्ग यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

