चंद्रपूर - कोरोना काळात मोदी सरकारने महागाई वाढवीत सामान्यांचे कंबरडे मोडून काढले आहे, अत्यावश्यक सामानाचे दर हे गगनाला भिडले आहे.
कांग्रेसच्या काळात पेट्रोल 62 रुपये, गॅस सिलेंडर 350 रुपये तर खाद्य तेलाचे भाव हे 60 रुपये होते मात्र मोदी सरकारने पेट्रोल शंभरी पार, गॅस सिलेंडर 900 व खाद्य तेल 170 रुपये केले.
मोदी सरकार जवळ देशाची आर्थिक व्यवस्था कशी चालवायची याबद्दल नियोजन नाही, आज देशाची अर्थव्यवस्था बांगलादेश च्या खाली आली आहे त्याचे सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान मोदी आहे, सरकार चालवीता येत नसेल तर मोदींनी चालते व्हावे अशी टीका कांग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.
आज राज्यभर पेट्रोल व डीझल च्या भाव वाढीविरोधात कांग्रेसने आंदोलन केले.
मूल मार्गावरील आदर्श पेट्रोल पंपावर कांग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी पेट्रोल वितरित करणाऱ्या मशीनची प्रतिकात्मक प्रतिकृती तयार करण्यात आली होती ज्यामध्ये मोदी ऑइल, पेट्रोल 100 रुपये लिटर असे प्रदर्शित करण्यात आले.
मोदी सरकार विरोधात नारेबाजी केल्यानंतर खासदार धानोरकर यांनी पंतप्रधान मोदी यांचेवर टीका करीत आज देशाची जीडीपी सर्वात खाली आली आहे, ज्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था बांगलादेश पेक्षा खराब झाली आज याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान मोदीजी आहे, त्यांच्याकडेअर्थव्यवस्था सांभाळण्याचे नियोजन नाही, त्यांनी आता चालते व्हावे, सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.
यावेळी कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर कांग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, कांग्रेसचे नगरसेवक, महिला कांग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
