चंद्रपूर - कोरोनाच्या लाटेत अनेकांना या विषाणूची बाधा झाली, या कालावधीत रक्तदानाचा ओघ कमी झाला.
सिकलसेल व थायलिसीमिया च्या रुग्णांना आधी मिळणाऱ्या रक्त पुरवठ्यात तफावत आली त्याची पूर्तता करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार मित्र परिवाराने 30 मे ते 30 जून पर्यंत IMA हॉल, गंजवार्ड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचे रक्त संकलन करून ते गरजूंना देण्याचं काम मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे सुरू आहे.
शहरातील रक्तदात्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत या महादान कार्यक्रमात सहभागी होत रक्तदान करण्याचे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.
