घुग्गुस - 4 जूनला घुग्गुस शहरातील शांतीनगर परिसरात 22 वर्षीय युवकाने 60 वर्षीय वृद्धेवर बलात्कार केला, या घटनेने शहरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
आरोपी 22 वर्षीय मोहम्मद यासिन नूर इस्लाम शेख याने अश्याप्रकारे घृणास्पद कृत्य करीत स्वतःच्या विकृत वृत्तीचा परिचय दिला आहे.
अश्या मानसिक विकृत वृत्तीच्या नराधमाला फाशी झाली पाहिजे यासाठी शहरातील प्रयास सखी मंचाने घुग्गुस पोलिसांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे.
मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी घुग्गुस पोलीस स्टेशनच्या सपोनि मेघा गोखरे यांची भेट घेत निवेदन दिले.
यावेळी सुचिता लुटे, पुष्पाताई रामटेके, नजमा कुरेशी, सुनंदा लिहितकर, प्रीती धोटे, पायल मांदाडे उपस्थित होत्या.
