चंद्रपूर - महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कडून संपूर्ण राज्यभर कोरोना काळातील गरजूंच्या मदती साठी 'मदतीचा एक घास' हा उपक्रम सुरू होता. मागच्या २६ दिवसांपासून हा उपक्रम चंद्रपूर महिला काँग्रेस कडून शासकीय रुगणालायत सुरू होता. राज्यात कडक लॉक डाऊन असल्याने सर्व उपहारगृह खानावळी बंद होत्या त्यामुळे रुगांच्या नातेवाईकांचे हाल होत होते. त्यातून गरजूंना दिलासा मिळवा यासाठी हा उपक्रम चंद्रपूर महिला काँग्रेस कडून राबवण्यात आला होता, याचे उदघाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले होते. या उपक्रमाला काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व नेते, त्याच सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सदिच्छा भेट दिली होती. संपूर्ण जिल्हा अनलॉक आणि सगळे व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने या उपक्रमाची सांगता करण्यात येत आहे, पण जर पुन्हा अशा पद्धतीचा लॉक डाऊन पुन्हा लागला तर परत महिला काँग्रेस कडून अशा पद्धतीचा उपक्रम सुरू करण्यात येईल त्याच सोबत कोरोना काळात संकटग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी महिला काँग्रेस पुढाकार घेईल असे आश्वासन या वेळी महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी दिले. त्या सोबत यावेळी त्यांनी या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे सोबतच माध्यमांनी जी दखल या उपक्रमाची घेतली त्या बद्दल सर्व वृत्तपत्र व माध्यम प्रतिनिधी यांचे देखील आभार मानले. या वेळी प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, उपाध्यक्षा सुनीता धोटे, उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, सचिव वाणी डारला, सदस्य लता बारापात्रे, राजेश सिंग चौहान यांची उपस्थिती होती.बल्लारपूर तालुका अध्यक्ष अफसाना उपाध्यक्षा सयद, शहर अध्यक्षा मेघा भाले, सुनीता धोटे, उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, सचिव वाणी डारला, सदस्य लता बारापात्रे, राजेश सिंग चौहान यांची उपस्थिती होती.
