प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल : येथील नवभारत विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक ऋषेश्वर गुरनुले यांच्या मातोश्री आणि चंद्रपूर जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा तथा भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या सासु श्रीमती साविञाबाई आबाजी गुरनुले यांचे संध्याकाळी ५.१५ चंद्रपूर येथील रूग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ९१ वर्षाच्या होत्या. स्व. साविञाबाई गुरनुले ह्या फिस्कुटी ग्राम पंचायतीचे सरपंच नितीन गुरनुले यांच्या आजी आहेत, त्यांच्या पश्चात बराच मोठा परीवार आहे.
