चिमूर : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प अंतर्गत येणाऱ्या पळसगाव येथे 3 वाघ एकत्र फिरत होते यावेळी एका वाघाने ग्रामस्थांवर हल्ला चढवीत त्याला जखमी केले. गावातील नागरिकांना ही बाब कळताच त्यांनी वाघाला हुसकावून लागले.
वाघाच्या हल्ल्यात एक ग्रामस्थ आणि STPF (special tiger protection force) चा जवान जखमी, चरणदास बन्सोड (56) असं ग्रामस्थाचं तर सुनील गज्जलवार असं जखमी stpf जवानाचे नाव आहे.
आज सकाळी पळसगाव येथील गाव तलावाजवळ 3 वाघ असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले, त्यानंतर लोकांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, यात गावकरी जखमी झाला, त्यानंतर स्थिती कंट्रोल करण्यासाठी आलेल्या STPF च्या जवानावर देखील वाघाने हल्ला करून जखमी केले, सध्या वाघ त्याच तलावाजवळ आहे, स्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात आहे.
