News34
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - मूल बचत गटातील महिला सक्षम व्हावे यासाठी चंद्रपूर मध्यवर्ती बॅंक नेहमीच बचत गटाना कर्ज वितरीत करीत आहे. बचत गटातील महिला-पुरूषांनी रोजगार करावे यासाठी बचत गटाना कर्ज पुरवठा केला जात असून बॅंक सदैव बचत गटाच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (CDCC BANK CHANDRAPUR)अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले. ते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्या. शाखा मूलच्या वतिने तालुक्यातील बचत गटाना कर्ज वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, भेजगावचे सरपंच अखिल गांगरेड्डीवार, बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी नंदुजी मडावी, बॅंकेचे शाखा व्यवस्थापक वाळके, वडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दुर्धर आजार असलेल्या अनेक शेतऱ्यांना रोगनिदान करण्यासाठी बॅंकेच्या माध्यमातुन 40 हजारापर्यंतचे अनुदान वाटप करण्यात आले आहे, घरचा कर्ता व्यक्ती वाघाच्या हल्यात ठार झाला किंवा विज पडुन मृत्युमुखी पडले अशा कुटुंबीयांना 10 हजार रूपये पर्यंतचे आर्थीक सहाय बॅंक करीत असून वेगवेगळया योजना प्रभावीपणे राबवित असल्याचेही संतोषसिंग रावत यांनी यावेळी सांगीतले.
कार्यक्रमाचे संचालन बचत गटाचे संयोजक अषोक पवार यांनी केले, उपस्थितांचे आभार बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी नंदुजी मडावी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठया संख्येने बचत गटातील महिला-पुरूष उपस्थित होते.
