घुग्गुस - 22 मे ला वणी वरून दारूची वाहतूक करणारा बल्लारपूर शहरातील कन्नमवार वॉर्ड येथे राहणारा 22 वर्षीय आदर्श बंडू पाटील याला घुग्गुस पोलिसांनी 2 लाखांच्या अवैध दारुसहित अटक केली होती.
जामिनावर सुटल्यावर आदर्श ने अवैध दारू व्यवसायातील आपले "आदर्श" गुण वापरत पुन्हा 7 जूनला वणी येथून दारूची वाहतूक करीत होता मात्र घुग्गुस पोलिसांना आधीच गुप्त माहिती मिळाली असल्याने त्याला आधीच त्याला बेलोरा पॉईंट वर अटक करण्यात आली.
सोमवार 7 जून ला जुगार व अवैध दारू याच्या रेडसाठी घुग्गुस पोलीस पेट्रोलिंग करीत होती.
काही वेळात पोलिसांना वणी जिल्हा यवतमाळ येथून अवैध दारूची वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली, पोलिसांनी बेलोरा टी पॉईंट वर सापळा रचला असता एक इसम पांढऱ्या रंगाची वरना गाडी क्रमांक MH31FE 9462 घेऊन येताना दिसला त्यावेळी पोलिसांनी त्याला थांबविले असता पोलिसही त्या इसमाला पाहून चक्रावले.
तो इसम दुसरा कुणी नसून 22 मे ला अवैध दारू वाहतूक करणारा आदर्श पाटील हा होता.
पोलिसांनी त्याला अटक करीत गाडीत असलेली देशी-विदेशी दारू सहित एकूण 16 लाख 66 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
