सावली : सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द ते मुडझाकडे जाणाऱ्या मार्गावर चीचबोडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना गुरूवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. जांब बुज. येथील बाळकृष्ण थोरात व दुमाजी बाबनवाडे अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहे. अपघात एवढा भीषण होता की अज्ञात वाहनाच्या धडकेत अक्षरशः दोघांनाही चिरडले. अपघात होताच धडक देणारे अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले. सदर घटनेची माहिती पोलीस विभागाला होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा कला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. अपघात नेमक्या कोणत्या वाहनाने झाला. याचा तपास सावलीचे ठाणेदार शिरसाट यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक चीचघरे करीत आहेत.
