पाथरी :- सद्या तेंदूचा हंगाम असून तेंदू संकलन करण्यासाठी परिसरातील जंगल भागात महिला, पुरुष जात असतात. आज सावली तालुक्यातील गेवरा येथील शकुंतला दिवाकर चौधरी वय 50 वर्ष ही महिला काही महिलांसोबत तेंदू संकलन करीत असतांनाच गोसेखुर्द च्या मोठ्या नहराजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने या महिलेवर हल्ला करीत गंभीर जखमी केले मात्र सोबतच्या महिलांनी प्रचंड आरडाओरड केल्याने वाघ हा पळून गेला. घटनेची माहिती वनविभाग ला देण्यात आली.वनाधिकारी घटना स्थळी आले. त्या जखमी महिलेला प्रथम अंतरगांव येथील प्राथमिक स्वास्थ केंद्रात भरती केले त्या नंतर तिला पुढील उपचार साठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले आहे. या परिसरात वाघाच्या हल्याचे प्रमाण वाढत असून शेतकरी ही भयभीत झालेले आहे.वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे तर जखमी महिलेला आर्थिक मदत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
