घुग्गुस/नकोडा - 15 मे शनिवारला घुग्गुस येथील नकोडा परिसरात वाढदिवशी तुफान हाणामारी झाल्याने नकोडा येथील वातावरण चांगलंच चिघळून गेले होते.
भाईगिरीच्या नादात एकाचा जीव जाता जाता राहिला.
नकोडा येथील अक्षय रत्ने ह्या युवकाचा वाढदिवस होता, त्यादिवशी अक्षय ला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या मित्रांनी चांगलीच गर्दी केली.
शुभेच्छांच्या वर्षावात सुमेर सिंग संदीप सिंग बैस व साथीदारांनी आम्ही चं गावातील भाई म्हणत अक्षय सोबत हमरी तुमरी केली.
या क्षुल्लक वादाची सुरुवात शाब्दिक बाचाबाचीने झाली मात्र शेवट तुफान हाणामारीत.
सुमेर सिंग व त्याच्या सहकाऱ्यांनी वादाला सुरुवात केली मात्र अक्षय रत्ने याचे सहकारी सरु उर्फ सरफराज पटेल यांनी सुमेर सिंगला चांगलेच बदडले.
सुमेर सिंग याला मारहाण झाल्याची बातमी सुमेर च्या घरी पोहचली असता त्याच्या कुटुंबीयांनी अक्षय च्या घरची वाट धरली व अक्षय ला जबर मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत अक्षय रक्तबंबाळ झाला होता त्याला तात्काळ पोलिसांनी उपचारार्थ रुग्णालयात पाठविले.
या हणामारीची तक्रार कल्पना मारोती रत्ने यांनी घुग्गुस पोलीस स्टेशनला दिली असता पोलिसांनी आरोपी सुमेर सिंग व कुटुंबियांवर 324 (34) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी सुमेर सिंगने सुद्धा मारहाणीची तक्रार दिली पोलिसांनी सरफराज पटेल यांचेवर 324, 448, 323, 504, 506 (34) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
प्रकरणाचा पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.
