(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - आज प्रामाणिकपणाच्या उगीचच बाता मारणारे अनेक लोक आहेत, त्यास काही अपवाद ही आहेत. मात्र, कोणाच्या कृतीतून हा प्रामाणिकपणा कधीच दिसत नाही. सद्यस्थितीत हरवलेली वस्तू परत करणे, हे कोणाकडून शक्य नाही. परंतु, असे काही लोक आहेत, जे प्रामाणिकतेला अधिक महत्व देत हरवलेली वस्तू परत करतात. सिंदेवाही मधील वाहतूक शिपाई शरद सावसाकडे यांना सिंदेवाही तील शिवाजी चौकातील परीसरातल्या रस्त्यावर पर्स पडलेला दिसला ते त्याने उचलले असता त्यात एटीएम कार्ड सह दोन हजार रुपये रोख होते. त्यात ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा होते. त्यावर नाव व पत्ता लिहिलेला होता.
कुणाल गोसीकवार रा. हेटी वार्ड सिंदेवाही हे पॅकेट पर्स हरवल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या घरी वाहतूक शिपाई शरद सावसाकडे व वैरागडे यांनी पॅकेट सह 2 हजार रुपये त्या व्यक्तीच्या घरी नेऊन दिले. हा प्रकार पॅकेट पर्स हरवलेल्या व्यक्तीने पोलिसात सांगताच पोलिस ठाणेदार घारे व पीएसआय नेरकर यांनी वाहतूक शिपाई असलेल्या शरद सावसाकडे यांचे कौतुक केले आहे.
