चंद्रपूर - मान्सुन काही दिवसावर आला असल्याने महावितरण चंद्रपूर परिमंडळाने मान्सुनपूर्व वीजयंत्रणा देखभाल व दुरूस्तीच्या कामात गती आणली असून अनेक महत्वपूर्ण कामे पार पडली आहेत. मान्सूनपूर्व कामाची देखभाल व दुरस्तीच्या कामात प्रामुख्याने झाडांच्या फांदया वीजवाहिन्यांना स्पर्शून वीजपुरवठा खंडीत होउ नये यासाठी झाडांच्या फांदयांची छटाई करणे, ढिल्या झालेल्या वीज वाहिन्यांना ताण देणे, वीजेच्या वाकलेल्या खांबांना तणावा देणे व सरळ करणे, वीजरोहित्रांत तेलाची मात्रा तपासून ती लेव्हल करणे, इंसुलेटर्स बदलविणे तसेच जंपर बदलविणे तसेच सरळ करणे व त्यांस ताण देणे यांचा समावेश असतो.
चंद्रपूर परिमंडळामध्ये येणाऱ्या चंद्रपूर व गडचिरोली मंडलात/ जिल्हयात ही कामे करण्यात आली आहेत. ग्राहकांचा वीजपुरवठा पावसाळयात सुरळीत राहावा यासाठी हे काम करण्यात आले आहे. यात चिनी मातीची इंसुलेटर्स हे गरम होत असतात व त्यावर पावसाचे पाणी पडले की, त्यांस तडे जावून त्यात पाणी शिरल्यास वीजपुरवठा खंडीत होत असतो. तर वीजवाहिन्यावर अडकलेल्या पतंगीच्या मांजामुळेही पावसात तो ओला झाल्यास वीजपुरवठा खंडीत होत असतो. तसेच डि.ओ.फयुज जाणे, रोहित्र बिघडणे, शार्ट सर्किट होणे, झाडाच्या फांदया वीजवाहिन्यांवर पडणे, फेज मधील बिघाड, जंपर तुटणे, डिस्क् इंसुलेटर किंवा पिन इंसुलेटर पंक्च्र होणे, सर्व्हिस वायरवर-जंपरवर कार्बन चढणे, सर्व्हिस वायरचे कान्टॅक्ट लूज होणे तसेच पावसामुळे होणारे बिघाड ज्यामध्ये पतंगच्या मांजा तारांत अडकल्यामुळे पावसात तो ओला होवून दोन फेजमध्ये शार्ट सर्किट घडवून आणतो व परिणामी वीजपुरवठा खंडीत होतो.
महत्वाचे म्हणजे यापैकी काही काम करतांना काम करत असतांना वीजदुरूस्तीच्या ठिकाणच्या यंत्रणेचा वीजपुरवठा हा उपकेंद्रावरून परमिट घेवून बंद ठेवावा लागत असतो. एअर ब्रेक स्विच ओपन करणे, वाहिनी आयसोलेट करणे, डबल सप्लाय होत असलेल्या ठिकाणी तेथील वीजपुरवठा बंद करावा लागतो. अन्याथा वीजदुरूस्तीचे काम करणाऱ्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असते.
पावसाळयात ग्राहकांनी महावितरणचे हे काम लक्षात घेता महावितरणला सहकार्य करावे. वीजपुरवठा खंडीत झाल्यास तो लवकरात लवकर सुरळीत करण्याचे प्रयत्न असतात परंतु पावसाळयाच्या दिवसात महावितरणचे कर्मचारी जीव धोक्यात घालूनच काम करीत असतात. ओले खांब असल्याने घसरून पडण्याच्या धोक्यासोबतच वीजेच्या धक्याचीही भिती असतेच. अनेक दुर्गम भागात वीजवाहिन्या जंगलातून गेल्या आहेत अश्या भागातून वीजपुरवठा वीजबिघाड शोधून दुरुस्त्त करावा लागतो व त्यासाठी वेळ लागत असतो.शिवाय जंगली श्वापादाचाही धोका असतो.
चंद्रपूर मंडलात करण्यात आलेली कामे
तारांवर गेलेल्या झाडांची गस्ती व पावसाळयात शार्ट सर्कीटमुळे विज पुरवठा खंडीत होउ नये यासा ठी झाडाच्या फांदया छाटणे असे ९ हजार ७६६ स्पेन्सची कामे, १ हजार २५९ पिन इन्सुलेटर बदलविणे, १ हजार ५९ डीस्क इन्सुलेटर बदलविणे, नविन ४२१ स्टे इन्सुलेटरना लावणे, ७४६ मिटर लांब वितरण रोहित्रांची अर्थिंग करणे, १४० रोहित्रामध्ये तेल टाकणे, जळालेले रोहित्र केबल २४८ ठिकाणी बदलविणे, २४१ सिलिका जेल बदलविणे, वीजरोधक २०६ ठिकाणी बदलविणे, २ हजार ७४ स्पेन्स जंपर्स बदलविणे, ३६३ खराब विज खांब बदलविणे, ५८६ स्पेन्सना उच्चदाब विजवाहिणीचे तर १ हजार ५८३ लघुदाब विजवाहिनीचे स्पॅन्स्ना तणावा देणे, उच्चदाब आणि लघुदाब आधारांची अर्थिंग १ हजार ९ ठिकाणी करणे, १७ किलोमिटर खराब आणि जुने झालेल्या विजवाहिन्या बदलणे, ५६१ स्पेन्स उच्चदाब आणि लघुदाब विजवाहिन्यांचे गार्डींग लावणे, १२३ रोड क्रासींगच्या ठिकाणी गार्डींग लावणे, २२४ सर्विस वायर बदलविणे, २२३ रोहित्र बदलविणे, ३७ उपकेंद्रांची अर्थिंग सुधारणे,१९० विजरोधक तपासणे, १४८ आसोलेटर्सची दुरूस्ती करणे, १४ हजार ७०४ लिटर्स तेल रोहित्रातील तेलाची पातळी तपासून त्यामध्ये टाकणे,३७ लघुदाब फिडर पीलरची तपासणी व दुरूस्ती करण्याचे काम, वीज वाहिन्याचे फेज वाऱ्यामुळे एकमेकांना स्पर्शू नये यासाठी कामे पावसाळयात विजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी ४ हजार ४८४स्पेसर्स लावण्यात आले आहेत. हि सर्व कामे
पावसाळयात विजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरण चंद्रपूर मंडलातील चंद्रपूर, वरोरा व बल्लारशाह विभागात करण्यात आले आहे.
गडचिरोली मंडलात करण्यात आलेली कामे
तारांवर गेलेल्या झाडांची गस्ती व पावसाळयात शार्ट सर्कीटमुळे विज पुरवठा खंडीत होउ नये यासाठी झाडाच्या फांदया छाटणे असे ३६ हजार ७२४ स्प्यान वर कामे, १ हजार ३५१ पिन इन्सुलेटर बदलविणे, ९१९ डीस्क इन्सुलेटर बदलविणे, नविन ३८४ स्टे इन्सुलेटरना लावणे, २५३ मिटर लांब वितरण रोहित्रांची अर्थिंग करणे, ३९१ रोहित्रामध्ये तेल टाकणे, जळालेले रोहित्र केबल २९४ ठिकाणी बदलविणे, ३१९ सिलिका जेल बदलविणे, वीजरोधक ३१९ ठिकाणी बदलविणे, १ हजार ९६४ ठिकाणी जंपर्स बदलविणे, ३३० खराब विज खांब बदलविणे, ५१५ ठिकाणी उच्चदाब विजवाहिणीचे तर १ हजार २५२ ठिकाणी लघुदाब विजवाहिनीचे स्पॅन्स्ना तणावा देणे, उच्चदाब आणि लघुदाब आधारांची अर्थिंग २६५२ ठिकाणी करणे, १७ किलोमीटर खराब आणि जुने झालेल्या विजवाहिन्या बदलणे, ३९० स्पेन्स उच्चदाब आणि लघुदाब विजवाहिन्यांचे गार्डींग लावणे, ६८ स्पेन्स रोड क्रासींगच्या वर गार्डींग लावणे, ११४ सर्विस वायर बदलविणे, १६६ रोहित्र बदलविणे, ९२ उपकेंद्रांची अर्थिंग सुधारणे, २५९ विजरोधक तपासणे, १४२ आसोलेटर्सची दुरूस्ती करणे, ३ हजार २८७ लिटर्स तेल रोहित्रात पातळी तपासून टाकण्यात आले आहे.
वीज वाहिन्याचे फेज वाऱ्यामुळे एकमेकांना स्पर्शू नये यासाठी कामे पावसाळयात विजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी १ हजार ५२५ स्पेसर्स लावण्यात आले आहेत. हि सर्व कामे महावितरण गडचिरोली मंडलातर्फे आलापल्ली, गडचिरोली व ब्रम्हपुरी विभागात करण्यात आले आहे.
