चंद्रपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्मानीय अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड 19 चा प्रादुर्भाव बघता चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात गरजूंना बेडशीट वाटप करण्यात आले तसेच चंद्रपूर जिल्हा कारागृह येथील कारागृह अधीक्षक श्री आत्राम साहेब यांच्या उपस्थितीत कैदी बांधवांना सॅनिटाईझर, मास्क आणि हॅन्ड ग्लोज चे वाटप करण्यात आले इतर पक्षाप्रमाणे नेत्यांच्या वाढदिवसाला बॅनरबाजी न करता मनसेतर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले.
कोविड काळात मनसेतर्फे रुग्णांना ऑक्सीजन सिलेंडर वाटप असो रुग्णांना नेण्यासाठी ॲम्बुलन्स ची व्यवस्था असो की गरीब रूग्णांचे वाढीव बिल माफ करणे असे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे.
सदर उपक्रमाचे आयोजन मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केले यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार,महिला सेना जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य मनविसे तालुका अध्यक्ष विवेक धोटे, ग्रामपंचायत सदस्य नितीन टेकाम, मनविसे उपजिल्हाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, शहराध्यक्ष नितीन पेंदाम, तालुका सचिव करण नायर, शहर उपाध्यक्ष सुयोग धनवलकर, रुग्णमित्र कृष्णा गुप्ता, विभागाध्यक्ष तुषार येरमे, चैतन्य सदाफळ व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

