घुग्गुस - औद्योगिक व प्रदूषित शहर म्हणून घुघुस हे राज्यात नावाजलेलं आहे.
शहरात सिमेंट, मेटल, कोल वाशरी सारखे अनेक उद्योग आहे, मात्र यांचं प्रदूषण शहरात मोठ्या प्रमाणात वाढले असून नागरिकांच्या आरोग्यावर याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहे.
कोरोनाच्या भीषण संकट समयी सुद्धा या उद्योगातून निघणारा धूर मानवी शरीरावर हानिकारक आहे.
जिल्ह्यात 1 तारखेला अचानक वादळ वारा सुटल्याने शहरातील लोयड्स मेटल कंपनीतून मोठ्या प्रमाणात धूर निघायला लागला, शहरावर या धुरीचे आवरण चढले की काय असे चित्र शहरवासीयांनी अनुभवले.
या धुरीचा नागरिकांच्या श्वसन प्रक्रियेवर घातक परिणाम होत असून कोरोना वाढीस प्रदूषणाचा सुद्धा मोठा वाटा आहे.
शनिवारी शहरातील अनेक भागात ह्या धुरीचे आवरण बघायला मिळाले, मात्र या धुरीवर एकही जागरूक जनप्रतिनिधी बोलायला तयार नाही कारण सदर उद्योगात त्यांचे कंत्राट सुरू आहे.
प्रदूषण विरोधात आवाज उचलला की कंत्राट बंद म्हणून यावर जनप्रतिनिधी काही बोलत नाही.
