वरोरा - 2 दिवसांपूर्वी वरोरा शहरात गांधी चौकात मित्राने मित्राची हत्या केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा अंबादेवी वार्डात सट्टा व्यावसायिक 32 वर्षीय शेख आबिद शेख यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.
घटनेने अंबादेवी वार्ड हादरून गेले, आज सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
मृतक हा वनविभागाच्या खाली पडलेल्या झोपडीत बकरा व कोंबडी पालन करण्याचा व्यवसाय सोबत सट्टा व जुगाराचा धंदा करायचा, मृतक आबिद च्या डोक्यावर व गळ्यावर धारदार शस्त्रांचे घाव होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे तात्काळ घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवं विच्छेदनसाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
आबिदची हत्या कोणत्या कारणाने झाली याचा तपास पोलीस करीत आहे.
