ब्रह्मपुरी - सहायक शिक्षक देवचंद मेश्राम 2 एप्रिलला कोट तलाव, ब्रह्मपुरी येथे आत्महत्या केली होती, मेश्राम यांच्या आत्महत्येला जवळपास 40 दिवस उलटले असून या प्रकरणी कुणावर कारवाई करण्यात आली नाही.
देवचंद मेश्राम यांच्या सुसाईड नोट मध्ये गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट, भाग शिक्षणाधिकारी प्रमोद उपलंचीवार, मुख्याध्यापक संजय बट्टे व मोरेश्वर गुरनुले यांनी दिलेल्या मानसिक व जातीवाचक शिवीगाळीमुळे मी आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट शब्दात लिहले होते.
या प्रकरणी सुसाईड नोट मध्ये उल्लेख असलेल्या सर्व आरोपींवर एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला परंतु अटक कुणालाही झाली नाही.
मृतक देवचंद मेश्राम यांच्या मुलांनी अमरावती दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत सदर प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्यात आली मात्र आमच्या वडिलांना आत्महत्येस परावृत्त करणाऱ्यांना पोलीस प्रशासन अटक कधी करणार? दोन्ही घटनेत साम्यता आहे तर न्याय देण्यासाठी दुजाभाव का? आम्हाला न्याय द्या अन्यथा 13 मे पासून ब्रह्मपुरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसण्याचा इशारा संघमित्रा मेश्राम, अमित मेश्राम, सुमित व सतीश मेश्राम यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
