चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील घोणसा येथील 18 वर्षीय मुलीने ग्लुकोज ऐवजी उंदीर मारण्याचे पावडर पिल्याने तिला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
20 मे ला 18 वर्षीय सानिका भारत कुलमेथे ग्लुकोज ऐवजी उंदीर मारण्याचे औषध पिले सानिया च्या आई व भावाने तिला तात्काळ वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यास सांगितले.
कुलमेथे परिवाराने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात सानिया ला दाखल केले मात्र सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स व परिचारिकेच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे 18 वर्षीय सानिया ला आपला जीव गमवावा लागला.
20 मे च्या रात्री डॉक्टरांनी तिला सलाईन व इंजेक्शन दिले त्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली, सानियाची आई व भाऊ यांनी परिचारिकेला याबाबत माहिती दिली मात्र तुमची मुलगी नाटक करत आहे असे बेजबाबदार वक्तव्य केले.
परिचारिकेने दुर्लक्ष केल्याने सानिया रात्रभर मृत्यूशी झुंज देत राहली अखेर सकाळी सानिया ने प्राण सोडले.
सानिया चा मृत्यू झाल्याची माहिती परीचारिकेला मिळाल्यावर तिने तिथून पळ काढला.
सानिया ही 12 व्या वर्गात शिकत होती, वडील नसल्याने दोन भाऊ व ती यांच्या शिक्षणाची जबाबदारी आईने पूर्ण केली.
मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकेने तिला मृत्यूच्या दारात नेऊन सोडले.
सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात कुलमेथे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले.
रुग्णांची सेवा करणे सोडून रुग्ण नाटक करीत आहे असे वक्तव्य करणाऱ्या परिचारिकेवर कारवाई व्हावी अशी मागणी कुलमेथे परिवाराने केली आहे.
वेतनासाठी भांडणारे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर व परिचारिका तुमच्या आंदोलनाने रुग्णांचा जीव टांगणीला असतो, तर तुमच्या बेजबाबदार पणाचे काय करायचं?
