चंद्रपूर - 17 मे ला चंद्रपूर ते मुल या मार्गावरून 18 वर्षीय हेमा सिंग या आपल्या मैत्रिणीसोबत पायदळ मोबाईल वर व्हिडीओ बघत जात असताना त्यावेळी मोटारसायकल वरून अज्ञात दोघांनी हेमा यांच्या हातातील मोबाईल हिसकावत तिथून पळ काढला.
सदर घटनेची तक्रार हेमा यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यावर रामनगर पोलिसांनी या प्रकरणी सायबर सेल ची मदत घेत त्या आरोपींचा शोध लावला.
गुन्ह्यातील आरोपी रोहित राजू शेट्टी व बिराज बिमल समद्दर राहणार बंगाली कॅम्प यांना सपोनि एकरे यांनी ताब्यात घेतले.
आरोपींकडून Realme कंपनीचा मोबाईल किंमत 15 हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक एमएच 34 एएन 7527 ला जप्त करण्यात आले.
शहरात काही महिन्यांपूर्वी सोनसाखळी चोरांचा हैदोस सुरू होता त्या टोळीला जेरबंद केल्यावर आता मोबाईल हिसकावणारे शहरातीलचं काही युवक असे कृत्य करीत आहे, मात्र रामनगर पोलिसांच्या तत्परतेने या आरोपींना अटक करण्यात आली.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या नेतृत्वात सपोनि एकरे, सपोनि मलिक, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, किशोर वैरागडे, सतीश अवथरे व सायबर सेल पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
