वरोरा - 3 दिवसात 2 हत्येच्या घटनेने वरोरा शहर हादरून गेले होते, अवैध धंद्यातील वर्चस्वाच्या लढाईत दोघांना आपले प्राण गमवावे लागले.
सुखराम अलाम व आबिद शेख यांच्या हत्येने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
आबिद शेखच्या हत्येनंतर पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे आवाहन समोर उभे होते मात्र वरोरा स्थानिक गुन्हे शोध पथकाने घडलेल्या हत्याकांडानंतर आरोपीला दिवस रात्र एक करीत त्यांचा पाठलाग करीत सुगावा लावला.
शेख यांच्या हत्येनंतर आरोपी मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते.
मात्र वरोरा गुन्हे शोध पथकाने आपले कर्तव्य बजावीत सदरक्षणाय खलनिग्रहणाय चे ब्रीद वाक्य यशस्वी करीत आरोपी देवा नौकरकर, गौरव वाळके यांना अटक करण्यात महत्वाची कामगिरी बजावली.
