घुग्गुस - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली, या संचारबंदीत फक्त अत्यावश्यक सेवाचं सुरू आहे मात्र व्यापारी या संचारबंदीचा फायदा घेत सरकारचे नियम पायदळी तुडवीत आहे.
घुग्गुस शहरात मंडळ अधिकारी, तलाठी व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने 21 मे ला शहरातील 8 प्रतिष्ठानावर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली.
यामध्ये पूजा मॅचिंग सेंटर, राधे राधे मेन्स वेअर, पायल ड्रेसेस, जोगी बुक डेपो, मनीषा ड्रेसेस, चौधरी क्लॉथ स्टोर्स, पटेल कम्प्युटर मोबाईल शॉप व राजधानी वस्त्र भांडार या प्रतिष्ठानावर दंडात्मक कारवाई करीत एकूण 11 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सदरची कार्यवाही उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

