घुग्गुस - 19 जून 2020 ला वडा जवळील रेतीघाट येथे काहींनी स्वतःला खनिकर्म अधिकारी सांगत अवैध वाळू उपसा करणाऱ्यापासून वसुली केली होती.
सदर प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खनिकर्म विभागातील महिला अधिकारी खेडेकर यांनी स्वतः पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याप्रकरणी प्रिया झाम्बरे व त्यांचे 2 साथीदार यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात वाळू उपसा करणारे नबी खान यांनी प्रिया झाम्बरे यांच्या विरोधात तक्रार केली होती, 22 जून 2020 ला झाम्बरे वर घुग्गुस पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला होता.
झाम्बरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणात न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता मात्र 12 मे बुधवारी उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
न्यायालयाने झाम्बरे यांच्या अटकेचे आदेश दिल्यावर घुग्गुस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात सपोनि मेघा गोखरे सह अवदेश, रंजना मत्ते व वर्षा बावणे ह्या बल्लारपूर ला दाखल झाल्या व प्रिया झाम्बरे यांना अटक करीत त्यांना न्यायालयात हजर केले.
न्यायालयाने प्रिया झाम्बरे यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
