घुग्घुस - देशात कोरोनाची महामारी पसरली असतांना मात्र अवैध धंदे बेफाम सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू असो की प्रतिबंधित सुगंधित तंबाखू हे मात्र अजूनही सुरूच आहे.
औद्योगिक व प्रदूषित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घुघुस शहरात आजही अवैध दारू व सुगंधित तंबाखू ची विक्री जोरात सुरू आहे.
शहरातील प्रत्येक चौकात सुगंधित तंबाखू पासून बनणारा खर्रा मिळविण्यासाठी साठी नागरिकांना मेहनत करावी लागत नसून तो आजही सहज उपलब्ध होत आहे.
खर्रा बनविणारे तर लहान मासे आहे मात्र हे बनविण्यासाठी लागणारा सुगंधित तंबाखू हा किराणा दुकानाच्या आड विकल्या जात आहे.
अत्यावश्यक सेवेचे प्रतिष्ठान सकाळी 7 ते 11 वाजता सुरू असतात मात्र आता त्या सेवेच्या नावावर अवैध धंदे सुरू झाले आहे, संचारबंदीतही सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात येत आहे.
कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या व्यापारात अनेकांनी आपले हात रंगविले आहे.
मानवी जीवनावर या तंबाखूचा भयानक दुष्परिणाम असून सुद्धा तंबाखूची मागणी काळ्या बाजारात चांगली आहे.
अवैध दारू, सुगंधित तंबाखु नंतर घुग्गुस शहरात अवैध सट्टा बाजार सुद्धा सुरू झाला आहे, हे सर्व अवैध धंदे पोलिसांच्या नाकाखाली सुरू असून यावर अजूनही कठोर कारवाई करण्यात आली नाही.