ब्रह्मपुरी - 12 मे ला ब्रम्हपुरी वनविभागाच्या आवळगांव वनपरिक्षेत्र अंतर्गत हळदा बिटातील संरक्षीत वनात कक्ष क्रमांक ११७८ मध्ये कुळे सावली पासून १०० मिटर अंतरावर गावच्या स्मशानभूमीत एक मादा बिबट मृतावस्थेत आढळून आली.
कुळे सावली येथील फिरायला बाहेर गेलेल्या इसमाला गावच्या स्मशानभूमीत आज सायंकाळी ५:३० वाजता दुर्गंधी आल्याने त्यांनी त्या परिसरात जाऊन बघितले असता एक अंदाजे ३ वर्षे वयाची मादा बिबट मृतावस्थेत आढळून आली. ही मृत बिबट दक्षिण ब्रम्हपुरी वनविभागाच्या आवळगांव वनपरिक्षेत्र अंतर्गत हळदा बिटातील, संरक्षीत वनक्षेत्र कक्ष ११७८ मध्ये आहे.
घटनेची माहिती मिळताच लगेच घटनास्थळी दक्षिण ब्रम्हपुरी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एल.शाह मॅडम सोबतच मानद वन्यजीव रक्षक ब्रम्हपुरी विवेक करंबेकर हे घटनास्थळी पोहोचले. मोक्का पंचनामा करून बिबट्या चा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.
सदर मादा बिबटचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण कळू शकले नाही.
मृत बिबट च्या शरिरावरील संपूर्ण अवयव शाबूत आहेत.
