गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरोनाच्या महामारीतही गडचांदूर शहरात विकास कामे दणक्यात सूरू असून ओपण स्पेस सौंदर्यकरण, डिवायडर वरील लाईट इतर कामां बरोबरच शहरात सध्या नाली बांधकामाची धूम सुरू आहे. हवसे नवसे ठेकेदार अचानकपणे प्रकाश झोतात आले असतानाच येथील जूना व लाडका नगरपरिषदेचा ठेकेदार शंभरकर यालाही नाली बांधकामचा ठेका मिळाला आणि सध्या स्थानिक मधूबन बैकरी पासून पुढे शहरात नालीचे बांधकाम शंभरकर ठेकेदार करीत असल्याची माहिती आहे.असे असताना मात्र सदर नालीचे बांधकाम अक्षरशः निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बोंब सुरू आहे.शहरात जाणाऱ्या या मुख्य मार्गावरील नाली बांधकामात ४,५ एमएमची राड व माती मिश्रीत रेतीचा वापर होताना दिसून येत आहे.न.प.च्या सिव्हिल इंजिनिअर यांनी मोक्यावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणे गरजेचे आहे.कारण याठिकाणी नालीच्या रूंदी बद्दल शंका व्यक्त होत असून ४,५ एमएमच्या राडची जाळी उभी करून भिंतीला धरूनच बांधकाम सूरू आहे.
सदर मार्गावर नेहमी लहान मोठ्या वाहनांची वरदळ असते.लगतच्या विविध दुकानदारांचा माल उतरविण्यासाठी मोठमोठी वाहने बाजूला उभी केली जाते. अशावेळी सदर नाली खरच वाहनांचा भार पेलणार का ? याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे. सदर ठिकाणाची परिस्थिती लक्षात घेता येथे कमीतकमी १२ एमएमचा राड वापरणे गरजेचे होते मात्र इंजिनीअर यांनी सदर नाली बांधकामांचे अंदाजपत्रक बनवताना मजबूतीकरणाची बाब लक्षात घ्यायला हवी होती.मात्र असे झालेले दिसत नाही.परिस्थिती नुसार अंदाजपत्रक कमी जास्त करता येते अशी माहिती असून जर अशाप्रकारे सदर नालीचे काम होत असेल तर नालीचे अस्तित्व किती दिवस ! हे सांगणे कठीण झाले आहे अशी उपहासात्मक चर्चा सध्या शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.विकासाच्या नावाखाली शहरात केवळ निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याची बोंब सुरू असून शहर विकासाच्या नावाने स्वतःचा विकास करून घेण्याची स्पर्धा युद्धपातळीवर सुरू असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सुध्दा काही दिवसांपूर्वी नालीचे बांधकाम बॉक्स न बनवता सुरू होते. त्यावेळी कही सुज्ञ नागरिकांनी सदर कामाच्या दर्जाबद्दल तक्रार केली होती. मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन काम बंद केले व संबंधित ठेकेदाराला बॉक्स बनविण्यासाठी भाग पाडले होते. तो नवखा ठेकेदार होता मात्र आता नगरपरिषदेचा लाडका,जूना,मूरलेला ठेकेदार शंभरकर याच्या कामा विषयी मुख्याधिकारी काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.