सोशल मीडियातून जरी लोकांना देशात आणि जगात काय चालले आहे हे समजत असले तरी खऱ्या बातम्या वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून लोकांना मिळत आहेत. मात्र, या महत्त्वाच्या बातम्यांसाठी देशातील असंख्य पत्रकार, वार्ताहर, वृत्तपत्राचे प्रतिनिधी, उपसंपादक, संपादक मंडळ, वरिष्ठ संपादक मंडळ आणि तंत्रज्ञ अपार कष्ट घेत आहेत. अचूक व निष्पक्ष बातमी मिळविण्याकरिता सतत प्रवास व कोरोना बाधित क्षेत्रातून पत्रकारिता करावी लागतात. आपल्या कुटुंबीयांसोबत न राहता अशावेळी देशाच्या सेवेसाठी आणि देशवासीयांना योग्य अचूक माहिती देण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. आपले कर्तव्य पार पडतांना काही पत्रकारांना कोरोना विषाणूची बाधा होऊन ते मृत्युमुखी पडले आहे. असेही या पत्रात आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या संकटामध्येही सर्वच क्षेत्रातील पत्रकार 24 तास कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या या मेहनतीला बळ मिळावे आणि त्यांना कोरोनाशी लढण्यासाठी आणखी शक्ती मिळावी यासाठी या महाराष्ट्र राज्यातील सर्वच पत्रकारांना ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करून कोरोना योद्ध्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा पत्रकार बंधूंना लागू कराव्यात अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केलेली आहे.
