प्रशांत गेडाम
सिंदेवाही - दिनांक 11/05/21 रोजी
सिद्धार्थ चौक, सिंदेवाही याठिकाणी सुमारे 30 फूट खोल विहिरी मध्ये एक इसम अचानक तोल जाऊन पडलेला आहे अशी माहिती मिळाली. सदरची माहिती मिळताच ठाणेदार योगेश घारे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय गोपीचंद नेरकर नापोशी गणेश मेश्राम, रणधीर मदारे, सतीश निनावे असे घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. सुखदेव विठ्ठल महाडोरे 47 वर्षे ही व्यक्ती विहिरीमध्ये पडली असून तो मध्येच अडकल्याचे दिसून आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सिंदेवाही पोलिसांनी काही स्थानिकांच्या मदतीने विहिरीमध्ये पडलेल्या इसमास रस्सी च्या सहाय्याने अथक परिश्रम करून बाहेर काढले व सुखदेव याचे प्राण वाचविले.
सुखदेव यांना वाचविण्यासाठी खाकी मधील माणुसकीचा सिंघम त्याच्या मदतीला धावला.
सुखदेव याच्या कुटुंबीयांनी तसेच स्थानिक नागरिकांनी सिंदेवाही पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक करून आभार मानले आहे.

